डहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक

अच्युत पाटील
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

बोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर छापा टाकून 25 जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. यामध्ये बांधकाम विभागाचे कंत्राटदार जितेंद्र चंपानेरकर, बाळू रत्नाकर, टाईल्सचे व्यापारी रोहिदास कुमावत, रामदास उर्फ झिपू झावरे, शंकर शेट्टी यांसह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. या सर्वांकडून 4 लाख 40 हजार 880 हजार रुपयांची रोख रक्कम, 3 लाख 84 हजार रुपयांचे 26 मोबाईल आणि 69 लाख रुपयांच्या 6 आलिशान गाड्या असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती चव्हाण यांनी राजतंत्रशी बोलताना दिली.

सर्व आरोपींना आज कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. हॉटेलचा मालक विनोद गुप्ता यालाही आरोपी करण्यात आले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आनंद सारस्वत यांनी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली!
पोलिसांनी हॉटेल पिंक लेक वर छापा मारल्यानंतर तेथे उपस्थित असलेला गवताचा व्यापारी आनंद सारस्वत याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने हात फ्रॅक्चर झाला असून त्याला वापी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तो प्रत्यक्ष जुगार खेळतांना न आढळल्याने त्याला आरोपी बनविण्यात आलेले नाही. आनंदने दुसऱ्या मजल्यावरुन उडी का मारली हा प्रश्न गुलदस्त्यात राहिला आहे.

Web Title: raid on hotel arrested 26 gambler