Raigad News: मिनीडोअर चालकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित

आत्‍मदहनाचा प्रयत्‍न अलिबागमध्ये तणाव
Raigad News
Raigad Newssakal

अलिबाग : मिनीडोअर चालकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने रायगड जिल्ह्यातील संतप्त मिनीडोअर चालकांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी आंदोलन केले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वतःला रॉकेलने पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्‍यांना अटकाव केला. मिनीडोअर संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्‍याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिनीडोअर संघटनेने दोन महिन्यांपूर्वी साखळी उपोषण केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्‍याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही सरकारकडून मिनीडोअर संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही.

राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची बैठक घेतली नाही. त्यामुळे संतप्त मिनीडोअर संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

आठ दिवसांपूर्वी त्‍यांनी याबाबत रक्ताने पत्र लिहून ते निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे यांना पाठवले होते. पत्र देऊनही कोणतीही भूमिका न घेतल्याने गुरुवारी पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. सकाळी दहा वाजल्यापासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

दुपारी एकच्या सुमारास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा देत सरकार व प्रशासनाविरोधात मिनिडोअर चालक व मालकांनी संताप व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. कित्येक तास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, साहायक निरीक्षक राजीव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर अखेर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या समवेत विजय पाटील, दिलीप भोईर, प्रमोद पाटील आदी शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीत बैनाडे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी मुंबईत बैठक बोलावल्‍याचे सांगितले.

Raigad News
Mumbai News : कुर्ल्याची उद्योगांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव; काँग्रेसचा आरोप

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्र देण्यात आल्‍यानंतरच मिनीडोअर चालक व मालकांनी आंदोलन मागे घेतले.

रायगड जिल्हा मिनीडोअर चालक-मालक संघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील मिनीडोअर चालक व मालकांनी सेवा बंद ठेवत जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी केली होती.

सेवा बंद झाल्याने अलिबाग रोहा, अलिबाग-पेण, पेण-रोहा, रेवदंडा-चणेरा, रेवदंडा-मुरूड, रेवदंडा-नांदगाव, अलिबाग-रेवस, अलिबाग-सारळ, आपटा-कर्जत, रसायनी, खोपोली, रोहा-कोलाड, कोलाड-माणगाव, माणगाव-महाड अशा अनेक मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मिनीडोअर सेवा बंद झाल्याने प्रवाशांनी मिळेल त्या वाहनांचा आधार घेत निश्चितस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा ताण एसटीवरही बसल्‍याचे दिसून आले.

Raigad News
Mumbai News : डोंबिवलीत रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांची मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com