Raigad Building Collapse: मृतांचा आकडा १५ वर, ३६ तासानंतरही बचावकार्य सुरूच

सुमित बागुल
Wednesday, 26 August 2020

मन हेलावून टाकणाऱ्या या दुर्घटनेला आता जवळपास 36 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. 

महाड : महाडमध्ये २४ तारखेला संध्याकाळी पाच माजली तारिक गार्डन नामक इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मन हेलावून टाकणाऱ्या या दुर्घटनेला आता जवळपास 36 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. 

ANI या वृत्तसंस्थेने या दुर्घटनेबाबतची ताजी आणि अधिकृत माहिती दिली आहे. महाड बिल्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल १५ जणांनी आपले प्राण गमावले असल्याचं आता स्पष्ट होतंय. यामध्ये सात पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार या बिल्डिंग दुर्घटनेननंतर एक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याचं समजतंय. NDRF च्या विविध टीम्स आणि ट्रेकर्सच्या माध्यमातून महाडमध्ये बिल्डिंगचा ढिगारा उपसून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.  

मोठी बातमी - सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यालाच CBI नोटीस ?

काल रात्री उशिरा शोध आणि बचाव मोहीम सुरु असताना एनडीआरएफ टीमला या ढिगाऱ्यात एक महिला जिवंत असल्याचे आढळून आले. इमारतीच्या  कोसळलेल्या स्लॅबखाली ही महिला जिवंत असल्याचं दिसून आलं होतं. सदर महिलेचे नाव मेहरुन्निसा अब्दुल हमीद काझी असून तिला जिवंत बाहेर काढण्यात NDRF ला यश आलं आहे. इमारतीच्या जीन्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या सापडल्या आहेत. मेहरुन्निसा सुखरूप असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याचीही माहिती असून त्यांना जवळच्या रानडे रूग्णालयात दाखल केले आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई हायकोर्टातील प्रत्यक्ष सुनावणी सोमवारपासून होणार सुरु

Raigad Building Collapse tragedy Death toll rises to fifteen 7 males and 8 females


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Building Collapse tragedy Death toll rises to fifteen 7 males and 8 females