Water Problem
Water Problem esakal

Raigad : ग्रामीण भागात दिवसाआड पाणी

४० हजार नागरिकांवर कपातीचे संकट

अलिबाग : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीतील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी ४४ वर्षांपूर्वी उमटे धरण बांधण्यात आले. मात्र धरणाचा गाळ काढण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरल्याने लगतच्या अनेक गावे-वाड्यांतील ग्रामस्‍थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जवळपास ४० हजारांहून अधिक नागरिकांना दिवसाआड पाणी उपलब्ध होणार आहे. २ जानेवारीपासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंमलबजावणीस सुरवातही केली आहे.

गतवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे १६ जानेवारीपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. मात्र यंदा पंधरा दिवस अगोदर पाणी कपात सुरू करण्यात आल्‍याने नागरिक चिंतेत आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत उमटे धरणाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते.

धरणात गाळ साचल्‍याने काही वर्षांपासून साठवण क्षमता कमी झाली आहे. त्‍यामुळे जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मध्यंतरी आठवड्यातील सात दिवसांपैकी सहा दिवसच पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. मात्र दिवसेंदिवस धरणाची पाण्याची पातळी कमी होत आहे. शिवाय जिल्हा परिषदेकडून धरणातील गाळ अद्यापही काढण्यात आलेला नाही. त्याचा फटका परिसरातील हजारो नागरिकांना बसतो आहे. पाण्याची पातळी कमी होत असल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

उमटे धरणातील पातळी कमी झाली आहे. नागरिकांना जूनपर्यंत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी दोन जानेवारीपासून पाणी कपातीला सुरुवात केली आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतींनादेखील कळविण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com