रायगडमध्‍ये गुलाबी, काळे कागद प्रभावी

अलिबाग : मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत.
अलिबाग : मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत.

अलिबाग : गेले २० दिवस रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आता जाहीर प्रचार थांबला असल्याने उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत असून अनेकांनी रविवारी रात्री मतदारांना ‘खूश’ करण्यासाठी कार्यकर्त्यांमार्फत जोरदार प्रयत्न केले. या ‘रात्री खेळ चाले’ रणनीतीला रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची भरारी पथके सतर्क होती. 

रायगड जिल्ह्यात मतदारांना मोठ्या प्रमणात पैशांचे प्रलोभन दाखवण्यात येते, असा आरोप वारंवार झाला आहे. यामधून ग्रामपंचायत निवडणुकाही मागे नाहीत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने जिल्ह्यात १७ भरारी पथके सज्ज ठेवली आहेत.  या अपप्रवृत्तीविरोधात राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाकडे या संदर्भात तक्रारी दाखल होत असल्याने पोलिसांनी रात्री जिल्ह्यातील सर्वच नाक्‍यांवर रात्रभर तपासणी केली. त्यानंतरही अनेक ठिकाणी स्थनिक कार्यकर्ते सक्रिय होते. त्यांच्याकडील काही ठिकाणी गुलाबी, काळा कागद प्रभावी ठरण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बाहेरगावी असलेल्या हक्काच्या मतदारांबरोबर संपर्क करणे आणि त्यांना मतदानासाठी बोलावून घेणे, प्रसंगी त्यांना आणण्याची व्यवस्था करणे ही महत्त्वाची कामे पालीतील अनेक कार्यकर्ते आज करत होते. तर काही पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी जीवाचे रान करताना दिसले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com