वाल पिकाला वातावरण बदलाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

बदलत्या वातावरणात आहे त्या स्थितीत वालाच्या शेंगा काढण्याची लगबग सुरू असून, घरातील महिला, पुरुष उन्हामध्ये शेतातील वालाच्या शेंगा काढण्याचे काम करीत असल्याचे चित्र खालापुरात आहे.

खोपोलीः पावसाळा संपताच तालुक्‍यातील बहुतेक शेतकरी शेतामध्ये कडधान्य लागवड करतात. यामध्ये मूग, हरभऱ्यासमवेत वालाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वर्षी वालाची शेती चांगली बहरल्याने समाधानकारक उत्पन्न मिळेल ही खात्री शेतकऱ्यांना होती; मात्र ही आशा फोल ठरली आहे. वातावरणातील बदलाचा पिकाला फटका बसला आहे. वाल पीक तयार झाल्यावर शेवटच्या आठवड्यामध्ये काही दिवस ढगाळ वातावरण व त्यानंतर रणरणत्या उन्हाचा सामना वाल पिकाला करावा लागत आहे. जमीन कोरडी पडली असून, त्याचा परिणाम वालावर झाला आहे. त्यामुळे उत्पन्न घटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कर्जतकरांचा श्‍वास कोंडला
 
बदलत्या वातावरणात आहे त्या स्थितीत वालाच्या शेंगा काढण्याची लगबग सुरू असून, घरातील महिला, पुरुष उन्हामध्ये शेतातील वालाच्या शेंगा काढण्याचे काम करीत असल्याचे चित्र खालापुरात आहे. त्यामुळे एक आठवड्याच्या आतमध्ये येथील वालाची शेती अंतिम टप्प्यात येईल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पावसाळी हंगामानंतर शेतकरी आपल्या शेतामध्ये कडधान्याची लागवड करतो. हिवाळी दवामुळे शेतामध्ये उत्तम असे कडधान्य निर्माण होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत होता; मात्र या कडधान्यांना निसर्गाची दृष्ट लागली आणि हाती आलेले पीक नष्ट होईल की काय, ही भीती शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत निर्माण झाली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या कडधान्यावर होत असल्याने दैनंदिन जीवनात कडधान्याची टंचाई भासत नसते. या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतीतून कडधान्य मिळेल ही आशा फोल ठरली आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये व सद्यस्थितीत अचानक थंडी तर मध्येच कडक उन्हाळा असे वातावरण राहिले. त्याचा विपरीत परिणाम होऊन वालाचे उत्पन्न कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
- काशिनाथ जाधव, शेतकरी, खालापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad farmar news

टॉपिकस
Topic Tags: