भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

या वर्षी भातशेतीचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपात झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून बुधवारी (ता. 4) शासन निर्णयानुसार भात उत्पादक शेतकऱ्यांना हा जादा मोबदला मिळणार आहे.

अलिबागः परतीच्या पावसात नुकसान झालेल्या रायगडमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने प्रतिक्विंटल 500 रुपयांच्या नियमित प्रोत्साहन राशीत या वर्षी 200 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे या वर्षी भात उत्पादक शेतकऱ्यांना 1 हजार 815 रुपये आणि 700 रुपये प्रोत्साहन राशीसह एकूण 2 हजार 515 प्रतिक्विंटल भातासाठी दर मिळणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या या जादा प्रोत्साहनपर रकमेमुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हा प्रवास अवघ्या १० मिनिटांचा
 
या वर्षी भातशेतीचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपात झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून बुधवारी (ता. 4) शासन निर्णयानुसार भात उत्पादक शेतकऱ्यांना हा जादा मोबदला मिळणार आहे. खरीपात भात हे प्रामुख्याने घेतले जाणारे रायगडमधील पीक असल्याने येथील अर्थव्यवस्था भातपिकावर अवलंबून आहे. परतीच्या पावसात जिल्ह्यातील 18 हजार 595 हेक्‍टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले होते. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव प्रोत्साहनपर राशीमुळे दिलासा मिळाला आहे. ऐन भातकापणीच्या वेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. कापलेले भात पावसात भिजल्यानेही हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले. यामुळे शेतकरी रडकुंडीला आला होता. 

रायगडमध्ये भात खरेदीला वेग येत आहे. परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरता यावे, यासाठी सरकारचे प्रतत्न आहेत. उपलब्ध होणाऱ्या निधीनुसार प्रोत्साहन राशीचे वाटप केले जाईल. 
- के. बी. ताटे, मार्केटिंग अधिकारी, रायगड 

वाढती मजुरी, बियाणे, खत, औषधांचा वाढता दर पाहून भातशेती करणे तोट्याचे झाले होते. मागील पावसाळ्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केलेल्या प्रोत्साहन राशीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्याची संधी मिळेल. 
- राजाराम पाटील, प्रयोगशील शेतकरी, अलिबाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad farmig news