दरड कोसळल्याने पोलादपूरमधील काटेतळी मार्ग बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

संततधारेमुळे रस्त्यालगतचा डोंगराकडील विजय जगताप यांच्या शेतीचा बांध निखळल्याने सतत रहदारी असलेल्या काटेतळी रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे तेथील रस्ता बंद झाला होता; परंतु पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या शुभांगी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई ः रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील तांबड भुवन गणेशनगर व काटेतळी मार्गावरील गणेशनगरजवळ संततधारेमुळे रस्त्यालगतचा डोंगराकडील शेतीचा बांध भिंतीसह कोसळला. त्यामुळे काटेतळी मार्ग बंद राहिला; मात्र दोन तासांत नगरसेविका शुभांगी चव्हाण यांच्या प्रयत्नाने मार्ग पूर्ववत झाला.

संततधारेमुळे रस्त्यालगतचा डोंगराकडील विजय जगताप यांच्या शेतीचा बांध निखळल्याने सतत रहदारी असलेल्या काटेतळी रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे तेथील रस्ता बंद झाला होता; परंतु पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या शुभांगी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठेकेदार संजय चव्हाण तसेच उद्योजक संतोष चव्हाण व सचिन दुदुस्कर यांनी तेथील रस्त्याची पाहणी केली. लगेचच एल अँड टी कंपनीच्या जेसीबीच्या साह्याने पीडब्ल्यूडीच्या सरकारी कर्मचारी हिरामण दुदुस्कर रस्ता मोकळा करून घेतला. त्या वेळी तांबड भुवनमधील सचिन दुदुस्कर, रूपेश भोसले, नितीन दुदुस्कर यांनीही सहकार्य केले. दोन तासांत रस्त्यावर कोसळलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. त्याबद्दल नगरसेविका चव्हाण यांच्या कार्यतत्परतेचे पोलादपूर शहरात कौतुक करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue