बोर्लीपंचतनमध्ये संततधार सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

बोर्लीपंचतनमध्ये भाजी विक्रेत्यांवर पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे जाणवत आहे. भाजी विक्रेत्यांना भाजी कुजत असल्याने टाकून द्यावी लागत आहे. पावसामुळे जनजीवनही विस्कळित झाले आहे. त्यामुळे बोर्लीपंचतनमधील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.

मुंबई ः रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्‍यातील मुख्य व मोठी बाजारपेठ असलेल्या बोर्लीपंचतन शहरामध्ये पावसाने थैमान घातले आहे. सतत आठ दिवस संततधार सुरूच आहे. याचा मोठा फटका व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांना बसत आहे.

बोर्लीपंचतनमध्ये भाजी विक्रेत्यांवर पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे जाणवत आहे. भाजी विक्रेत्यांना भाजी कुजत असल्याने टाकून द्यावी लागत आहे. पावसामुळे जनजीवनही विस्कळित झाले आहे. त्यामुळे बोर्लीपंचतनमधील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.

बोर्लीपंचतन ही आजूबाजूच्या 17 खेडेगावांची मोठी व महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील व्यापाऱ्यांना नैसर्गिक अडचणीबरोबरच इतर अडचणींचाही सामना करावा लागत आहे. बाहेरून येणारे व्यापारी टेंपोमधून कमी प्रतीचा माल घरपोच देत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. हल्ली फक्त सणासुदीलाच बाजारपेठ थोड्याफार प्रमाणात गजबजलेली असते. इतरवेळी बाजारातील गर्दी खूपच कमी असते. त्याचा फटका स्थानिक भाजी विक्रेते व इतर व्यावसायिकांना बसत असल्याने त्याचा परिणाम आर्थिक उलाढाल व रोजगारीवर होत आहे. त्यावर अबलंबून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

काही दिवसांनंतर येऊ ठेपणाऱ्या सणांच्या दिवसातही अशीच परिस्थिती राहिली तर व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ यायला वेळ लागणार नाही, अशी चिंता व्यावसायिकांना होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue