पोलादपुरात झाड कोसळून वीजपुरवठा खंडित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

रात्री 11 वाजता झाड पूर्णतः बाजूला करून रस्ता पूर्ववत करून पुरवठा पूर्णपणे चालू करण्यात आला.

पोलादपुरात झाड कोसळून वीजपुरवठा खंडित 
मुंबई ः धुवाधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरातील प्रभातनगर येथे ओम अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री 8 वाजता मोठे झाड कोसळले. त्यामुळे विद्युतवाहिनी तुटून शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. रस्ता बंद झाल्याने वाहतूकही खोळंबली.

याची माहिती मिळताच प्रभातनगर येथील रहिवासी सचिन मेहता, उमेश सवादकर, दिनेश दरेकर घटनास्थळी दाखल झाले. मेहता यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून जेसीबी व संबंधित यंत्रणा उपलब्ध करण्यास सांगितले. तातडीने एल अँड टीचे पर्यवेक्षक संदीप यांनी दोन जेसीबी व कामगार उपलब्ध करून झाड हटविण्याचे काम सुरू केले. वीज वितरणचे कर्मचारीही दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने काही परिसरातील खंडित झालेला पुरवठा चालू करून नागरिकांची सुटका केली. रात्री 11 वाजता झाड पूर्णतः बाजूला करून रस्ता पूर्ववत करून पुरवठा पूर्णपणे चालू करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue