महाडमध्ये 30 घरांची पडझड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

महाडमध्ये गेल्या आठवडाभरापासून संततधार सुरूच असून, मुसळधार पावसात तालुक्‍यातील विविध गावांत घरांचे नुकसान झाले. रायगड किल्ला परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पाचाड, रायगडवाडी, छत्री निजामपूर, पुनाडे या गावांतील घरे कोसळली. पाचाडमध्ये सात, रायगडवाडी 13, छत्री निजामपूर तीन, पुनाडेमध्ये दोन घरांचे नुकसान झाले.

मुंबई (बातमीदार) ः शहर व परिसरात पडणारा मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने अतिवृष्टीत तालुक्‍यातील विविध गावांत जवळपास 30 घरांची पडझड झाली. भातशेतात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरल्याने शेतीचेही नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यात सहा दिवसांत जवळपास 937 मिलिमीटर पाऊस तालुक्‍यात झाला आहे. शहरातील सखल भागात पाण्याचे बस्तान अजून कायम आहे.

महाडमध्ये गेल्या आठवडाभरापासून संततधार सुरूच असून, मुसळधार पावसात तालुक्‍यातील विविध गावांत घरांचे नुकसान झाले. रायगड किल्ला परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पाचाड, रायगडवाडी, छत्री निजामपूर, पुनाडे या गावांतील घरे कोसळली. पाचाडमध्ये सात, रायगडवाडी 13, छत्री निजामपूर तीन, पुनाडेमध्ये दोन घरांचे नुकसान झाले. पाचाड गावात राजेंद्र खातू, अनिल खातू, किसन भोसले, गोविंद भोसले, ललिता भोसले, लता मोरे, गोपाळ गायकवाड यांच्या घरांचा समवेश आहे; तर रायगडवाडी गावातील गणपत साटम, पुनाडे गावातील जितेंद्र लामजे, मारुती कंक यांच्या घरांचे नुकसान झाले.

येथील तलाठी योगेश वार्डे यांनी पंचनामा केला आहे. तालुक्‍यातील कोसबी गावातील जितेंद्र जाधव आणि त्यांचे भाऊ या दोघांच्या घरांचे तर सोलमकोंड येथील पांडुरंग सुतार, चोचिंदे गावातील भानुदास जाधव, रमेश मांडवकर, शांताराम भुवड, रूपवली गावातील प्रकाश शिर्के, विजय शिर्के, सीताबाई साळवी, नडगाव तर्फे बिरवाडी गावातील निर्मला मांडे, बिरवाडी वेरखोले येथील चंद्रकांत तांबे, मोहोप्रे येथील अनिल पवार यांचा जनावरांचा वाडा, तेलंगे गावातील मुक्ता मुकणे, दाभोळ गावातील बंडू रामा नाडकर यांच्या घरांची पडझड झाली असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue