लोणेरे विद्यापीठ परिसर पाण्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

लोणेरे विद्यापीठ 500 एकर जागेत वसला असुन हा सर्व परिसर पाण्याखाली आला. अचानक आलेल्या या पावसाने पाण्याचा लोंढा वाढल्याने विद्यार्थ्यानां बाहेर काढण्यासाठी दोरी चा वापर करावा लागला.

मुंबई ः माणगाव तालुक्‍यात मंगळवारी (ता. 6) पडलेल्या मुसळधार पावसाने येथील डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसर पूर्णपणे पाण्यात गेला होता. पहेल व गोरेगाव येथे पावसामुळे दरड व भिंती कोसळून दुर्घटना घडल्या.

लोणेरे विद्यापीठ 500 एकर जागेत वसला असुन हा सर्व परिसर पाण्याखाली आला. अचानक आलेल्या या पावसाने पाण्याचा लोंढा वाढल्याने विद्यार्थ्यानां बाहेर काढण्यासाठी दोरी चा वापर करावा लागला.

गेली अनेक तास मुसळधार पाऊस पढ़त असल्याने तसेच या परिसर लगत नदी असल्याने या नदीच्या चारी बाजूस असणाऱ्या डोंगरातून पाणी आल्याने अचानक पाणी वाढल्याने येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्याची मोठी तारांबळ उडाली. या परिसरातील कर्मचारी राहत असलेल्या इमारतीच्या खलील रूम मध्ये पाणी घुसले तसेच त्यांच्या गाड्याहि पाण्यात बुडाल्या. या सर्व गोष्टीन मुळे या विदयापीठास चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. या परिसरातील सर्व रस्ते पाण्याखाली आल्याने सर्व विद्यार्थ्याना येथुन सुखरूप बाहेर काढण्यासाठी विद्यापीठ प्रशासनने विशेष काळजी घेतली. दोरी चा वापर करून त्याना कॉलेज मधुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वाय पॉईंट ते पेट्रोकेमिकल कॉलेज , डिग्री कॉलेज , कर्मचारी वसाहतीत खुप मोठ्या प्रमाणांत पाणी होते. 

घरांचीही पडझड 
मुंबई-गोवा महामार्गावर रेपोली ते तळेगावदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने चालकांना या पाण्यातून गाडी काढणे मोठ्या जिकिरीचे झाले. गोरेगावमधील बाजारपेठेत केदार खुळे यांच्या घरच्या मागील भिंत कोसळून पडली. इंदू धर्मा केकाणे यांचे घराचीही भिंत पडली. गोरेगावनजीक नागाव गावातील वसंत हाटे यांच्या घराची एक बाजू कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue