महाडमध्ये पुराचा व्यापाऱ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

भाजी विक्रेते, छोटे हॉटेल व्यावसायिक, औषध विक्रेते डिजिटल प्रिंटर, वैद्यकीय व्यावसायिक, सलून, कापड दुकान, किराणा माल अशा अनेक दुकानदारांची हानी झाली.

मुंबई ः महाड शहरात गेले तीन-चार दिवस पुराची ये-जा होती. सावित्री नदीच्या पाण्याने आज शहरातील व्यापाऱ्यांना दणका दिला. महाडमधील व्यापारी पुरामुळे पूर्णपणे हवालदिल झाले असून, अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील महात्मा गांधी मार्गावर असणारी ही जुनी बाजारपेठ, त्यानंतर नवीन बाजारपेठेमध्ये दुकानांना याचा मोठा फटका बसला. शहरामध्ये थेट साळीवाडा नाकापासून नवेनगर तर चवदार तळ्यापासून लायन्स क्‍लब परिसरापर्यंत सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शहरातील अनेक लहान-मोठी दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली. भाजी विक्रेते, छोटे हॉटेल व्यावसायिक, औषध विक्रेते डिजिटल प्रिंटर, वैद्यकीय व्यावसायिक, सलून, कापड दुकान, किराणा माल अशा अनेक दुकानदारांची हानी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue