महावितरणविरोधात तळामध्ये धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पावसाला सुरुवात झाल्यापासून तळा तालुक्‍यात सतत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज सकाळी 11 वाजता बळीच्या नाक्‍यावरून महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मुंबई ः महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात आज तळा शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने धडक मोर्चा काढला. सततच्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे नागरिक त्रस्त असून, हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

पावसाला सुरुवात झाल्यापासून तळा तालुक्‍यात सतत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज सकाळी 11 वाजता बळीच्या नाक्‍यावरून महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा काढण्यापूर्वी ऍड. उत्तम जाधव, नगरसेवक चंद्रकांत रोडे, जिल्हा परिषद सदस्य बबन चाचले यांनी समस्या मांडल्या. त्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी बळीच्या नाक्‍यावर नागरिकांशी संवाद साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue