खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळेना !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबई : खोपोली शहरासह खालापूर तालुक्‍यातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना खोपोली नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अजूनही खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

खोपोली शहरासह ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पत्र, मागण्या, आंदोलने यांचा कोणताही परिणाम प्रशासकीय यंत्रणा व त्यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांवर होत नसल्याचा आरोप युवक आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला.

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी प्रशासन तयार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे खोपोली पालिकेच्या नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीबाबत सर्वेक्षण झाले आहे. पहिल्या टप्प्यात खडी टाकून मोठे खड्डे बुजविले जातील. त्यानंतर डागडुजीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
- अमितकुमार सर्वगौड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, कर्जत उपविभाग

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad issue