‘कोंढाणे’च्या पाण्यावर कर्जतचा हक्क

टिळक चौकात उपोषणाला बसलेले आमदार सुरेश लाड.
टिळक चौकात उपोषणाला बसलेले आमदार सुरेश लाड.

कर्जत : कोंढाणे धरणाचे पाणी फक्त कर्जतला मिळावे, अशी मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारपासून (ता. २७) टिळक चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

राज्य सरकारने कोंढाणे धरण नवी मुंबई महापालिकेला देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला; तसेच नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिका सभेत उल्हास नदीवरील धरणाचे पाणी फक्त पनवेलला मिळावे, असा ठराव झाल्याचे समजते. या निर्णयांना आमदार सुरेश लाड यांनी तीव्र विरोध दर्शवत मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात कर्जतला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे, असे आमदार लाड यांनी सांगितले. कर्जत ही हुतात्म्यांची भूमी आहे; त्यामुळे आमच्या न्याय्य हक्कांसाठी-पाण्यासाठी वेळप्रसंगी लढा देण्याची तयारी आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी कोंढाणे धरणाच्या जागेवर अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करू दिले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, नगरसेवक शरद लाड व सोमनाथ ठोंबरे, एसआरपीचे उत्तम जाधव, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे, ॲड्‌. प्रतीक्षा लाड, बळीराम देशमुख, रत्नाकर बडेकर, राजू हजारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com