नेरळमध्ये हातभट्ट्या उद्‌ध्वस्त 

रसायनीने भरलेली पिंप फोडताना पोलिस.
रसायनीने भरलेली पिंप फोडताना पोलिस.


नेरळ  : बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्‌ध्वस्त केल्या. नेरळ पोलिसांनी एका आठवड्यात तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्‌ध्वस्त केले असून गावठी दारू बनविणाऱ्यांविरुद्ध पुन्हा शड्डू ठोकले आहेत. 

बेकरे गावाच्या हद्दीत खांबाया मंदिर आणि कोला धबधबा परिसरात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर उपनिरीक्षक रतीलाल तडवी आणि राम शिद यांनी अन्य पोलिसांसह बेकरे येथे जाऊन गावठी दारूचे अड्डे उद्‌ध्वस्त केले.

या कारवाईत पोलिसांनी नवसागर गूळमिश्रित रसायन भरलेल्या पाच प्लास्टिक पिंपामधील रसायन जमिनीवर ओतून टाकले; तसेच ते पिंप फोडून टाकले. त्याच वेळी तेथे रबरी ट्यूबमध्ये भरलेले रसायन आणि दारू गाळण्याचे साहित्य हेदेखील फोडून टाकले. याबाबत नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नीलेश वाणी यांनी तक्‍र्रार दिली आहे. या कारवाईत नेरळ पोलिसांनी 36 हजार 100 रुपयांचे गावठी दारू बनविण्याचे साहित्य जमीनदोस्त केले. 

बेकरे गावाच्या उत्तर बाजूला असलेल्या खांबाया मंदिर परिसरात पोलिसांनी धाड टाकली. तेथे ओहोळाच्या बाजूला गावठी दारू बनविली जात होती. येथे सहा प्लास्टिक पिंपे आढळून आली. त्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिंपांत रसायन भरले होते. ते रसायन नेरळ पोलिस ठाण्यापर्यंत आणणे शक्‍य नसल्याने पोलिसांनी ते सर्व रसायन तेथे जमिनीवर ओतून प्लास्टिक पिंपे फोडून टाकली. त्याच वेळी तेथे दारू गाळण्याच्या टाक्‍या आढळून आल्या असून त्या टाक्‍या देखील फोडून टाकण्यात आल्या. या कारवाईत नेरळ पोलिसांनी तब्बल 4,1100 रुपयांचे साहित्य जमीनदोस्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com