‘कोंढाणे’साठी न्यायालयीन लढाईला तयार

 रस्‍त्‍याची कामे सुरू झाल्‍याने आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सोडले.
रस्‍त्‍याची कामे सुरू झाल्‍याने आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सोडले.

नेरळ : रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्‍यालाच मिळावे, या मागण्यांसाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सुरू केले होते. रस्त्यांची कामे सुरू झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी (ता. २७) उपोषण मागे घेतले. कोंढाणे मुद्द्यावर न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे सांगत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आक्रमक होण्याचे आवाहन केले.

कर्जत-कल्याण रस्त्याचे काँक्रीटीकरण, पुरात नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व प्रस्तावित कोंढाणे धरणाचे पाणी पनवेल किंवा सिडकोला न देता कर्जत तालुक्‍यालाच मिळावे, या मागण्यांसाठी आमदार सुरेश लाड यांनी मंगळवारी सकाळी उपोषण सुरू केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे यांनी आमदार लाड यांची भेट घेऊन रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. 

कर्जत-डोणे भागातील रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू न केल्याबद्दल आमदार लाड यांनी नाराजी व्यक्त केली होती; परंतु उपोषणाची नोटीस दिल्यानंतर किरवली येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू झाल्याचे समजले. कोंढाणे धरण आणि रस्त्यांच्या कामाबद्दल सरकारच्या वतीने कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी पत्र दिल्यानंतर रात्री ८ वाजता त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, गोरख गवळी, नायब तहसीलदार संजय भालेराव, सुधाकर राठोड, पोलिस निरीक्षक अशोक भोर, रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती नरेश पाटील, सदस्य सुधाकर घारे, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, शरद लाड उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com