ढोल-ताशांच्‍या गजरात ७२ हजार गणेशमूर्तींना निरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अलिबाग : पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर जिल्ह्यात गौराईसह ७२ हजार २२७ गणेशमूर्तींचे समुद्र, नदी, तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. विसर्जनानिमित्त जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाणावलेले डोळे आणि ढोलताशांचा गजर, अशा संमिश्र वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. भरपावसात अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या होत्या. गणेशमूर्ती पावसात भिजू नये, यासाठी गणेशमूर्तीला प्लास्टिक कापडाचा आधार देण्यात आला. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अलिबागसह अन्य ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील सार्वजनिक ९३, खासगी ५७ हजार ९४७ असे एकूण ५८ हजार ४० गणेशमूर्ती; तर १४ हजार १८७ गौरींच्या मूर्ती, फोटोंचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात गौराईसह ७२ हजार २२७ गणेशमूर्तींचे समुद्र, नदी, तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले.

गणरायाला निरोप देण्यासाठी तलाव, विहीरी, समुद्रकिनारी येथे भाविकांची गर्दी झाली होती. विसर्जनाच्या कालावधीत सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, १३ पोलिस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ३८४ पोलिस कर्मचारी, चार विशेष पथक, १०० रेल्वे पोलिस, ६०० महिला व पुरुष होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. 

अलिबाग समुद्रकिनारी मदत केंद्र
अलिबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन सार्वजनिक व एक हजार ५००  खासगी असे एकूण पाचशे दोन गणेशमूर्ती व एक हजार २०० गौरींच्या मूर्ती व फोटोंचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्यावेळी कोणतीही हानी होऊ नये, यासाठी अलिबाग नगरपालिकेच्यावतीने स्वयंसेवकांद्वारे मूर्तींचे विसर्जन बोटीद्वारे करण्याची सोय केली होती. समुद्रकिनारी ठिकठिकाणी नऊ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue