वाकण-खोपोली प्रवास खडतर

वाकण - पाली - खोपोली राज्य महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे चालकांच्‍या जीवाला धोका आहे.
वाकण - पाली - खोपोली राज्य महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे चालकांच्‍या जीवाला धोका आहे.

पाली : वाकण- पाली- खोपोली राज्य महामार्ग ५४८ (अ) रुंदीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणातून शनिवारी (ता.७) व रविवारी (ता.८) या मार्गे परतणाऱ्या भाविकांचे हाल झाले. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी, भाविक व नोकरदारांचा प्रवासही खडतर झाला. 

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन अनेक गणेशभक्त शनिवारी व रविवारी कोकणातून यामार्गे पुणे-मुंबईकडे निघाले होते. त्यामुळे या राज्य महामार्गावर वाहनांची गर्दी होती. परळी येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागून गेली आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे, दगडगोटे; तसेच चिखलाचा राडारोडा झाला आहे. तर अनेक ठिकाणी खड्ड्याची अक्षरशः तळी झाली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाकणपासून जंगलीपीर, बलाप, पाली ते थेट रासळ, पेडली, परळी, नाणोसे; तसेच पाली फाट्यापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची तकलादू डागडुजी करण्यात आली होती. 

गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस खूप असल्याने खड्डे भरण्याचे व रस्ता सुस्थितीत करण्याचे काम करता येत नाही तरीदेखील या मार्गावर अनेक ठिकाणी डागडुजीची कामे सुरू आहेत. पाऊस कमी झाल्यावर चांगल्या प्रकारे खड्डे भरून रस्ता सुस्थितीत केला जाईल.
- सचिन निफाडे, उप-अभियंता, एमएसआरडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com