नागोठण्यात चोरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

प्रवेश करून घरातील पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेली 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील रोख रक्कम 30 हजार व सोन्याच्या कुड्या व 6 बारावारी साड्या तसेच जागेचे कागदपत्र असे एकूण 47 हजार 600 रुपये किमतीचा माल घरफोडीत चोरी करून नेला.

नागोठणे : नागोठण्याजवळील पाटणसई आदिवासीवाडीतील कमळी सोन्या पवार यांच्या घरातून रोख रक्कम, दागिने व साड्या या स्वरूपात एकूण 47 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीची ही घटना रविवारी (ता. 8) रात्री घडली.

रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 च्या दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार महिला श्रीमती कमळी सोन्या पवार या त्यांचे नातीचे घरी गेल्या असता अज्ञाताने त्यांच्या बंद घराच्या मागील काठ्यांचा दोरीने बांधलेला दरवाजा उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेली 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील रोख रक्कम 30 हजार व सोन्याच्या कुड्या व 6 बारावारी साड्या तसेच जागेचे कागदपत्र असे एकूण 47 हजार 600 रुपये किमतीचा माल घरफोडीत चोरी करून नेला.

याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी. जी. मेंगाळ तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue