दीपगृहाची बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

हे दीपगृह नादुरुस्त असेल तर परिसरातील मच्छीमार संस्थांना पूर्वकल्पना देणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात संबंधित खात्याने बत्ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

मुरूडः रात्री-बेरात्री खोल समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या होड्यांना मुरूड तालुक्‍यातील किनारपट्टीवर कोर्लई किल्ल्यावर तर दिघीजवळच्या मणेरी-नानवेल डोंगरी भागात दीपगृह कार्यान्वित असून, रात्रीच्यावेळी उंच डोंगरावरील दीपगृहातील प्रखर दिव्यांच्या प्रकाशझोतात मुख्यत्वेकरून दिशा कळू शकते. पैकी दिघीजवळील नानवेलची बत्ती बंद पडल्याने सुसाट वाऱ्यात सापडलेल्या अनेक मच्छीमार नौका भरकटण्याचे प्रकार घडले आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून मणेरी-नानवेल येथील दीपगृह (बत्ती) नादुरुस्त असल्याने येथील प्रखर दिव्यांचे लखलखणे थांबल्याने रात्री दिशा समजण्यास मच्छीमारांच्या अडचणीत वाढ होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. होड्या इच्छित ठिकाणी न जाता भलत्याच ठिकाणी जाऊन भरकटल्या असल्याची माहिती जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. याच टापूत महाकाय खडक असल्याने होड्या आदळण्याचा धोका संभवतो, असे सांगितले.

हे दीपगृह नादुरुस्त असेल तर परिसरातील मच्छीमार संस्थांना पूर्वकल्पना देणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात संबंधित खात्याने बत्ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue