साखरचौथ बाप्‍पाचे आज आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अलिबाग : अनंत चतुर्दशीच्या गणरायाच्या विसर्जनानंतर साखरचौथच्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले होते. अखेर ही उत्कंठा संपली आहे. अंगारक चतुर्दशीच्या दिवशी साखरचौथच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून जिल्ह्यातील 650 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. 

गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागीरांना गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे शक्‍य होत नाही, त्यामुळे 10 दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर चतुर्दशीच्या दिवशी ही मंडळी साखरचौथच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करतात. गेल्या तीन वर्षांपासून साखरचौथच्या दिवशी गणेशमूर्ती आणण्याचा ट्रेंड वाढला असून गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागीरांसह अन्य मंडळीदेखील साखरचौथच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करू लागले आहेत. त्यामुळे साखरचौथच्या गणेशमूर्तींची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

मंगळवारी येणाऱ्या साखरचौथच्या गणरायाच्या स्वागताची तयारी चार दिवसांपासून करण्यात आली असून वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. जिल्ह्यात 292 सार्वजनिक व 358 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue