कर्जतमध्ये तांबस रस्त्याला भगदाड 

तांबस रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला आहे.
तांबस रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला आहे.


कर्जत : कर्जत तालुक्‍यातील तांबस गावातून कडावकडे जाणाऱ्या रस्त्याला रविवारी अचानक मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होऊन काही गावांचा संपर्क तुटला आहे. 

कडाव बाजारपेठेकडे जाण्यासाठी वदप, गौरकामथ, जांभिवली, बारणे, साळोख, सापेले रस्ता तांबस गावातून जातो. या रस्त्यापासून थोड्याच अंतरावर राजनाला आहे. जुलै महिन्यात डोंगराचे पाणी राजनाल्यात येऊन अतिरिक्त पाण्याचा साठा होऊन राजनाला वाहू लागला. त्यामुळे राजनाल्याला मोठे भगदाड पडले. त्यातून बाहेर पडलेले पाणी आणि मातीमुळे त्यावेळी रस्ता बंद झाला होता.

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर तेथे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर वाहत असलेले पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याखाली असलेल्या मोऱ्या स्वच्छ केल्या, तसेच रस्त्यालगत चर खणून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला; परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्याची धूप होऊन रस्ता खचून मोठे भगदाड पडले. त्यामुळे त्यापुढील गावांकडे जाण्याचा दळणवळणाचा संपर्क तुटला. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने दशरथ मुने यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com