खोपोलीत अपघातग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी देवदूत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

खोपोली : अचानक उद्‌भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत बहुतांश जण आपआपल्या परीने अपघातग्रस्तांना मदत करत असतात. ही सेवा करत असताना अनेक तांत्रिक बाबींची माहिती असावी, या हेतूने लायन्स क्‍लब ऑफ खोपोली व सेव्ह लाईफ फाऊंडेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स सर्विस सेंटर; खोपोली येथे आपत्कालीन मदतीसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

या प्रशिक्षणामधून सर्वांच्या मनात आपणही देवदूत असल्याची भावना जागृत करण्यात आली. अपघातात मदत करण्यासंबंधी सरकारचे नवीन नियम धोरणाच्या माहितीसह सीपीआर प्रणालीची माहिती या वेळी देण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष कृती अवगत करून घेतली. सहज सेवा फाऊंडेशन, खोपोली यांच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली; ज्याद्वारे अपघात वा संकटकाळी रुग्णांना रुग्णवाहिकेमध्ये हलविण्यात येताना घ्यावयाची काळजी विषद करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष लायन क्‍लब सुजित पडवळकर, सचिव लायन जितेंद्र परदेशी, खजिनदार लायन राकेश ओसवाल, उपाध्यक्ष लायन रमेश पाटील, लायन नारायण कट्टी, लायन दिवेश राठोड, लायन सोमनाथ हेगडे, प्रकल्पप्रमुख लायन शेखर जांभळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सेव्ह लाईफ फाऊंडेशन, दिल्ली यांच्या वतीने डॉक्‍टर दीक्षान्त चौहान व सारिका राठोड यांनी अतिशय शिस्तबद्धरित्या सर्वांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाद्वारे वाहतूक नियमाबाबतही मार्गदर्शन करण्‍यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue