नेरळमध्ये विद्यार्थी वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नेरळ : गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या वाल्मीकीनगर प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम ठप्प झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत असल्याने नवीन वर्गखोली मंजूर करण्यात आली होती; मात्र वर्गखोलीचे काम रखडल्याने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. 

कर्जत तालुक्‍यातील नेरळ गावात वाल्मीकीनगर परिसरात रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ९६ विद्यार्थी दोन खोल्यांमध्ये कोंबून बसविले जात आहेत. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानमधून एक वर्गखोली मंजूर करण्यात आली होती; मात्र तेथील आदिवासी जमिनीचा प्रश्‍न निकाली निघाल्यानंतर जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. 

कर्जत पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानाने नेमलेल्या कंत्राटदाराने एप्रिल महिन्यात वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराने पावसाळा सुरू होईपर्यंत वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातदेखील वाल्मीकीनगर शाळेतील विद्यार्थी दाटीवाटीमध्ये बसून शिक्षण घेत आहेत. दोन वर्गखोल्यांत असंख्य विद्यार्थी बसत असून त्यांना शिक्षण कसे द्यायचे, हादेखील प्रश्‍न कायम आहे.
 
आम्हाला स्थानिकांच्या तक्रारी वारंवार येत आहेत; मात्र वर्गखोलीचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सूचना करीत होतो. कंत्राटदार नियमानुसार काम करणार नसेल तर त्यावर कारवाई केली जाईल.
- सुरेखा हिरवे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue