कर्जतकरांची कोंडीतून सुटका

नगरपालिकेलगत शाळेसमोर धोकादायक रोहित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.
नगरपालिकेलगत शाळेसमोर धोकादायक रोहित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.

कर्जत : कर्जत शहरातील बहुतांश रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाले आहे. रुंदीकरण करून काही रस्त्यांना पाच ते सात वर्षे झाली; परंतु रस्त्यांच्या मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्‍यात न आल्‍याने कर्जतमधील रस्ते रुंद होऊनही वाहतूक कोंडीची समस्‍या कायम होती. अखेर वीज वितरण कंपनीने धोकादायक विजेचे खांब हटविण्याच्या हालचाली सुरु केल्‍या आहेत. त्‍यामुळे कर्जतमधील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. 

कर्जतमधील रस्‍त्‍याच्‍या मध्‍ये असलेल्‍या विजेच्‍या खांबामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. याबाबत संबंधित कार्यालयांना कर्जतकरांनी लेखी निवेदने देऊन खांब हटविण्याची विनंती केली; परंतु नेहमीच तांत्रिक अडचणीचे कारण सांगून याकडे दुर्लक्ष करण्यात आले; मात्र रस्त्याच्या मध्ये आलेले विजेचे खांब काढण्यासाठीचे अंदाजपत्रक पालिकेला सादर केल्याचे वीज वितरण कंपनीने ‘आपले सरकार’ पोर्टलच्या आधारे विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अहवालाद्वारे स्पष्ट केले आहे.   

याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा आधार घेऊन संबंधित कार्यालयांना प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर वीज वितरण कंपनीने खांब काढून हटविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक पालिकेकडे सादर केल्याचे व अन्य प्रश्‍न सोडविण्यात आल्याचा अहवाल उपकार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि  ओसवाल यांना पाठविला आहे. 

वीज वितरण विभागाकडून खांब हटविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केल्याचे सांगण्यात आलेले असले तरी अद्यापि मला प्राप्त झालेले नाही. 
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत पालिका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com