खोपोलीत खड्डे भरण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

खोपोली : विधानसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने, शहरातील रस्त्यांची कामे रखडणार आहेत. त्यामुळे शहरातील खड्डे भरून नागरिकांना दिलासा द्यावा, यासाठी विविध सामाजिक संस्थांनी मुख्याधिकारी गणेश शेटे यांना साकडे घातले आहे.

खोपोली : विधानसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने, शहरातील रस्त्यांची कामे रखडणार आहेत. त्यामुळे शहरातील खड्डे भरून नागरिकांना दिलासा द्यावा, यासाठी विविध सामाजिक संस्थांनी मुख्याधिकारी गणेश शेटे यांना साकडे घातले आहे.

खोपोली शहरातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नगरपालिकेकडून रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे दहा कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र कधीही आचारसंहिता लागणार असल्याने पुढील तीन महिने रस्त्यांच्या कामांसहित अन्य नवीन विकासकामे करता येणार नाहीत. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडे रस्तेदुरुस्तीची मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरात लवकर शहरातील खड्डे आधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञान वापरून बुजविण्यात येतील, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खड्ड्यांमुळे शहरातील प्रवास धोकादायक झाला आहे. संपूर्ण रस्ते निर्मिती किंवा नव्याने डांबरीकरण होईल तेव्हा होईल, तत्पूर्वी सर्व धोकादायक खड्डे भरण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले. 

गणपती उत्सवादरम्यान प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आली आहेत. मात्र मुसळधार पावसाने पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे आता पुन्हा खड्डे भरण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.
- सुमन औसरमल, नगराध्यक्षा खोपोली नगरपालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue