अलिबागमधील रस्त्याची साफसफाई

रेवदंडा मार्गावरील रस्त्याची साफसफाई करताना श्री सदस्य
रेवदंडा मार्गावरील रस्त्याची साफसफाई करताना श्री सदस्य

अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अलिबाग तालुक्‍यातील २७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रविवारी स्वच्छता करण्यात आली. ५५९ श्रीसदस्यांनी तब्बल १५ टन कचरा गोळा केला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्‍यातील चेंढरे बायपास ते कुरुळ माळी समाज सभागृह (४ किलोमीटर), कुरुळ ते बेलकडे फाटा (३ किलोमीटर), बेलकडे फाटा ते आक्षी पूल (३ किलोमीटर),  बेलकडे फाटा ते सहाण बायपास (८ किलोमीटर), सहाण बायपास ते पाल्हे पूल (६ किलोमीटर) आणि रेवदंडा बायपास रोड ते रेवदंडा एसटी स्टॅण्ड (३ किलोमीटर) अशा एकूण २७ कि.मी. रस्त्यांची दुतर्फा स्वच्छता करण्यात आली.

प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण रक्षणासाठी सुरू  केलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन, शैक्षणकि साहित्य वाटप, विविध सरकारी दाखले वाटप, अंध व मुकबधिर विद्यार्थ्यांना साहित्य पुरवणे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी धरण, तलाव, विहिरी यांची साफसफाई करणे यांसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com