नागोठणेत हायवे नाक्‍यावर घरफोडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

चोरट्यांनी इमारतीत प्रवेश करून आधी इतर खोल्यांच्या कड्या बाहेरून लाऊन घेतल्या. त्यानंतर संबंधित खोलीचे टाळे, कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. नंतर खोलीतील सामानाची उलथापालथ करून 15 हजार रुपये व चांदीचे छोटे दागिने घेऊन पलायन केले.

नागोठणे : शहरातील हायवे नाका परिसरातील एका इमारतीमधील बंद खोलीचे कडी-कोयंडे तोडून रोख रक्कम व चांदीच्या वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. घरफोडीची ही घटना सोमवारी (ता. 23) रात्री घडली.
 
नागोठण्यातील हायवे नाका परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगतच्या इमारतीत अनेक कुटुंबे भाड्याने राहत आहेत. चोरी झालेल्या बंद खोलीतील कुटुंब आपली खोली बंद करून कामानिमित्त इतरत्र गेले होते. या संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी इमारतीत प्रवेश करून आधी इतर खोल्यांच्या कड्या बाहेरून लाऊन घेतल्या. त्यानंतर संबंधित खोलीचे टाळे, कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. नंतर खोलीतील सामानाची उलथापालथ करून 15 हजार रुपये व चांदीचे छोटे दागिने घेऊन पलायन केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळेस आपली गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue