सोनसाखळी चोरटे रडारवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

अलिबाग : सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या खबऱ्यांमार्फत, सीसी टीव्ही फुटेज तसेच जुने व नव्या माहितीनुसार गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली आली. त्यामुळे सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. 

अलिबाग : सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या खबऱ्यांमार्फत, सीसी टीव्ही फुटेज तसेच जुने व नव्या माहितीनुसार गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली आली. त्यामुळे सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. 

गेल्या दोन वर्षांत एकूण २६ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १५ गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश आले. त्यात ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित ११ गुन्ह्यांची लवकरच उकल लवकरच होईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्‍त केला. 

जिल्ह्यातील कर्जत, दादरसागरी, नेरळ, अलिबाग, नागोठणे, रेवदंडा, रोहा, पेण, वडखळ, पोयनाड, महाड तालुका, खोपोली, पोलादपूर, गोरेगाव, या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांमध्ये २७ गुन्हे दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्यांची तत्काळ उकल करण्यास सुरुवात करण्यात आली. २०१८ मध्ये कर्जतमध्ये तीन, वडखळमध्ये तीन, कर्जत, दादर सागरी, नेरळ, अलिबाग, नागोठणे, रेवदंडा, रोहा, पेण, पोयनाड, महाड तालुका या ठिकाणी प्रत्येकी एक असे एकूण १५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी नेरळ, नागोठणे, कर्जत, रेवदंडा, रोहा, पेण, वडखळ, पोयनाड येथील १० गुन्हे उघडकीस आणले असून त्यात २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

२०१९ मध्ये पेण पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, वडखळमध्ये दोन, कर्जत, खोपोली, कोलाड, गोरेगाव, अलिबाग, रेवदंडा व पोलादपूरमध्ये प्रत्येकी एक असे एकूण १२ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी पेणमधील दोन, वडखळ, रेवदंडा, पोलादपूर येथील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश आले. यात नऊ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.

 

रायगड जिल्ह्यातील सोनसाखळी चोरट्यांवर अंकुश ठेवण्यामध्ये यश आले आहे. उर्वरित गुन्ह्यांची उकल देखील लवकरच होईल. आरोपींची माहिती उपलब्ध झाली असून त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने रायगड जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. 
- अनिल पारस्कर, पोलिस अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue