कुपोषणाचा प्रश्‍न सोडविणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कर्जत : कर्जत आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषित मुलांचे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून कुपोषणाचा प्रश्‍न सोडविण्याचा सरकारस्तरावर प्रयत्न सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयांत कुपोषित बालकांसाठी बाल उपचार केंद्र सुरू केले असून ही सेवा चांगल्या दर्जाची मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी प्रकाश देवऋषी यांनी सांगितले.

रुग्णालयातील बालकांची भेट घेऊन कुपोषणाचा प्रश्‍न अधिक जलद गतीने सोडविण्यासाठी जिल्हास्तर सोडून उपजिल्हा रुग्णालय स्तरावर कुपोषणाचा प्रश्‍न सोडविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्जत पंचायत समिती कार्यालयात अतिरिक्त मुख्याधिकारी प्रकाश देवऋषी यांनी भेट दिली. या वेळी कुपोषणाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत अंगणवाडी सेविकांच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.

ग्रामीण भागात आदिवासी वाड्या पाड्यात जाऊन पाहणी करत कुपोषित मुलांच्या कुटुंबीयांना योग्य ती माहिती देत संबंधित मुलांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील बाल उपचार केंद्रात दाखल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी गटविकास अधिकारी बालाजी पुरी, उपगटविकास अधिकारी चत्तरसिंग राजपूत, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue