माँसाहेब आपण पुढे चला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पाली : राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेतील एक अनोखा प्रसंग समोर आला आहे. मुख्य संयोजक अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांचे काही दिवसांपूर्वी पालीत जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी पाली आगर आळीतील शांताबाई खंडागळे या आज्जीनी गर्दीतून पुढे येत कोल्हे यांच्याशी संवाद साधला. या वेळी सभोवताली गर्दीचा वेढा पडलेला असतानादेखील त्यांच्याशी संवाद साधून ‘माँसाहेब आपण पुढे चला..., असे मोठ्या आदराने म्हणत कोल्हे यांनी माँसाहेब जिजाऊंचा मान शांताबाई यांना दिला.

गर्दीतून कसेबसे पुढे येत शांताबाईंनी कोल्हे यांना साद घातली. मी शिवस्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका नियमित बघते, आपल्या उत्कृष्ट अभिनयातून हुबेहूब राजे डोळ्यासमोर उभे राहतात, असे म्हणताच कोल्हे यांनी त्यांचे खास शैलीत आदर व कौतुक केले; तर सभोवताली गर्दीचा वेढा पडलेला पाहून ‘माँसाहेब, आपण पुढे चला’, असे मोठ्या आदराने म्हणत त्यांना माँसाहेब जिजाऊंचा मान दिला. 

या वेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आजमितीस विद्यमान सरकारच्या काळात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. महिला असुरक्षिततेची भावना घेऊन जगत आहेत. आमच्या मायभगिनींना मानसन्मान व संरक्षण देण्याचे काम आम्ही करू असेही त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue