रस्त्याच्या अर्धवट कामामुळे धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नेरळ : कर्जत तालुक्‍यातील कोंडिवडे-दहिवली-जांभिवली-कडाव-चिंचवली या राज्य मार्ग रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या मार्गावर काँक्रीटच्या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

नेरळ : कर्जत तालुक्‍यातील कोंडिवडे-दहिवली-जांभिवली-कडाव-चिंचवली या राज्य मार्ग रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या मार्गावर काँक्रीटच्या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

चिंचवलीपासून कडाव-तांबस-जांभिवली-दहिवली-कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्याच्या कामाला राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या २५ किलोमीटर भागात ज्या ज्या ठिकाणी गाव वस्ती आहे, त्या त्या ठिकाणी रस्त्यावर काँक्रीटचा भाग आणि अन्य ठिकाणी डांबरी रस्ता करण्यात येणार आहे. २०१८ पासून या रस्त्यावर कामे सुरू असून ती सर्व कामे संथगतीने सुरू आहेत. जागोजागी अर्धवट असलेल्या कामांमुळे स्थानिक रहिवासी आणि चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

वेणगाव येथे कंत्राटदाराने गावातून वदपच्या दिशेला काँक्रीटचा रस्ता तयार करताना रस्त्यावर २० मीटर अंतराचा रस्ताच बनविला नाही. त्या ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्यावर बनलेला एक फुटाचा २० मीटर लांबीचा खड्डा वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात खड्डा दिसत नसल्याने येथे अपघाताची शक्‍यता आहे.

वेणगाव येथील अर्धवट कामाबद्दल कंत्राटदाराला सूचना करण्यात आली आहे. आता पुन्हा सूचना करूनदेखील काही झाले नाही तर वरिष्ठांना अहवाल दिला जाणार आहे. 
अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
 

वेणगाव येथील रस्त्याच्या अर्धवट कामाबद्दल प्रशासनाला कळविले आहे. मात्र, सर्व अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत. या अधिकाऱ्याविरुद्ध आवाज उठविण्याची आवश्‍यकता आहे.
दशरथ मुने, किसान सेल जिल्हा अध्यक्ष, जनहित लोकशाही पक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue