कर्जतमधील कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

तालुक्‍यातील कुपोषणाच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी सरकारच्या आरोग्य व महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या सीटीसी बाल उपचार केंद्रास कर्जतच्या प्रांताधिकाऱ्यांसह इतर शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत प्रभागातील स्वच्छता व पोषणाबाबत सूचना दिल्या. 

कर्जतः सीटीसीमधून बरे होऊन परत घरी गेलेल्या मुलांचा पाठपुरावा करून त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी दिशा केंद्राच्या मदतीने व मोहीम स्वरूपात हे काम नियमित ठेवण्याचे नियोजन आहे. आरोग्य व बालविकास विभागासह सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने तालुक्‍यातील कुपोषण प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यासाठी नियोजन केले आहे, आश्‍वासन प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी आज येथे केले.

तालुक्‍यातील कुपोषणाच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी सरकारच्या आरोग्य व महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या सीटीसी बाल उपचार केंद्रास कर्जतच्या प्रांताधिकाऱ्यांसह इतर शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत प्रभागातील स्वच्छता व पोषणाबाबत सूचना दिल्या. 

येथील दिशा केंद्राच्या पोषण हक्क गटाच्या वतीने जिल्हा तसेच राज्य स्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीपीडीसीमधून मंजूर केलेल्या निधीमधून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात, कुपोषित मुलांसाठी बाल उपचार केंद्र सुरू केले आहे. या बाल उपचार केंद्रात एकूण 13 तीव्र कुपोषित मुले उपचार व पोषण सेवा घेत आहेत. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या केंद्रास समाजातील सर्व स्तरांतील नागरिक, शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देत मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. 

आहाराबाबत सूचना 
प्रांताधिकरी वैशाली परदेशी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे स्वच्छता व आहार पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहाराबाबत सूचना केल्या. मुलाच्या वजन वाढीबाबतची व मुलांची मेडिकल ग्रोथ कशी याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडून घेतली. एकात्मिक आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी आहीरराव यांनी बाल उपचार केंद्रासाठी आवश्‍यक तो निधी यापुढेही उपलब्ध करून दिला जाईल याबाबत आश्वासित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue