हेटवणे येथे कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पेण : हेटवणे धरणाच्या पानेड गावानजीक असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजता घडली. या वेळी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे. स्वप्नील सुभाष पाटील (रा. फणस डोंगरी, पेण) असे त्‍यांचे नाव आहे.

स्वप्नील हा आपल्या मित्राच्या कुटुंबासह हेटवणे धरण परिसरात बुधवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेला होता. धरणाच्या पायथ्याला असलेल्या पानेड गावाच्या हद्दीतील कालव्यात तो आपल्या दोन मित्रांसह पोहायला उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने स्वप्नीलसह त्याचे दोन मित्र कालव्यात बुडाले.

दोन मित्रांना वाचवण्यात यश आले, तर स्वप्निलला अधिक उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पेण पोलिस ठाण्यात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue