नेरळमध्ये साडेआठ लाखांच्‍या घरफोडीने घबराट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नेरळ : नेरळ गावात गंगानगर परिसरात एका रहिवाशाच्या घरी साडेआठ लाखांची घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ५३ हजारांची रक्कम आणि सुमारे ८ लाख ५६ हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.

नेरळ : नेरळ गावात गंगानगर परिसरात एका रहिवाशाच्या घरी साडेआठ लाखांची घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ५३ हजारांची रक्कम आणि सुमारे ८ लाख ५६ हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.

नेरळ पूर्व भागातील गंगानगर भागात स्वप्नील मधुकर लिंडाइत (वय ३१) यांचे घर आहे. मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी प्रवेश केला.  घरातील लोखंडी आणि लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी ५३ हजारांची रोख रक्कम आणि ८ लाख ५६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले.ही बाब नेरळ पूर्व भागात मेडिकल स्टोअर्स चालविणारे लिंडाइत यांना सकाळी लक्षात आली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक भोर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. 

त्यानंतर अलिबाग येथून रायगड पोलिसांचे श्वानपथक बोलाविण्यात आले असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे. चोरीला गेलेल्यात सोन्याचे दागिने, सोनसाखळी, गंठन, ब्रेसलेट, अंगठ्या अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue