पावसामुळे भातशेती पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अलिबाग: गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या जोरदार पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. 

अलिबाग: गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या जोरदार पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. 

जिल्ह्यामध्ये काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दोन दिवस जोरदार सुरुवात केली. या पावसामुळे सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. या पावसामुळे जिल्ह्यातील भाताची रोपे आडवी झाली आहेत. भातपिकाचे नुकसान होण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

जून महिन्यापासून पडत असलेल्या पावसात जिल्ह्यातील १५ हजार हेक्‍टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. ५० हजारहून अधिक शेतकऱ्यांवर यामुळे मोठे संकट आले आहे.  भात आता निसावण्याच्या मार्गावर असताना पावसामुळे पीक पाण्याखाली आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली असून सरकारने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी शशिकांत पाटील यांनी केली. 

गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे परिपक्व झालेली भातरोपे आडवी झाली आहेत. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे; मात्र ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करून भरपाई देण्यात येईल. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue