पेणमध्ये आदिवासींची रॅली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पेण : उरण तालुक्‍यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रहात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी प्राणाची आहुती दिली होती. या घटनेला ८९ वर्षे पूर्ण झाली असून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या या हुतात्म्याला श्रद्धांजली देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी पेण तालुक्‍यातील आदिवासींनी पेण शहरातून रॅली काढली होती. 

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, अंकुर ट्रस्ट पेण व लोकमंच, महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे यांच्यासह असंख्य आदिवासी सहभागी झाले होते. आदिवासींना वनहक्क मान्यता कायदा २००६ अन्वये जे दावे दाखल केले होते. ते अजून नावावर झालेले नाहीत. त्यामुळे या स्मृतिदिनानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील प्रलंबित सर्व दावे निकाली काढावेत, आदिवासींच्या दाव्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue