कुस्ती स्पर्धेत कर्जतच्या मल्लांचे यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नेरळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये कर्जत तालुक्‍यातील मल्लांनी चमकदार कामगिरी केली आहे. कुस्तीमधील चारही गटात कर्जतचे मल्ल अव्वल ठरले आहेत.

नेरळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये कर्जत तालुक्‍यातील मल्लांनी चमकदार कामगिरी केली आहे. कुस्तीमधील चारही गटात कर्जतचे मल्ल अव्वल ठरले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेकडून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.त्यातील कुस्ती गटात कर्जत तालुक्‍यातील मल्ल असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठी मजल मारून विभाग स्तरावर आपली आगेकूच कायम ठेवली आहे.कर्जत तालुक्‍यात कुस्तीगीर तालिम संघ काम करीत असून मोठ्या प्रमाणात शालेय जीवनापासून विद्यार्थी कुस्तीचे धडे गिरवीत असतात. त्यात कर्जत तालुक्‍यातील सावळे गावातील मल्ल सरस ठरत आहेत.

तालुक्‍यात बाजी मारत कर्जत तालुक्‍यातील मल्लांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतदेखील या मल्लांनी सर्व गटात अव्वल येऊन बाजी मारली आहे. त्यात ४८ किलो वजनी गटात सुधीर दामू रसाळ, ५५ किलो वजनी गटात युवराज निरंजन उमरसिंग, ६१ किलो वजनी गटात किरण बाळकृष्ण धुळे आणि ७१ किलो वजनी गटात मानव नरेश धुळे या सर्व मल्लांनी बाजी मारली आहे. या सर्व मल्लांना तालुका कुस्तीगीर तालिम संघाचे अध्यक्ष भगवान धुळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue