पेणमध्ये आघाडीत बिघाडी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पेण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात साठ हजार मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असल्याचे उमेदवार नंदा म्हात्रे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पेण : राज्यात कॉंग्रेसची राष्ट्रवादी, शेकाप, पीआरपी (कवाडे) गट अशी आघाडी असताना पेण मतदारसंघात मात्र कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या नंदा म्हात्रे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल, पेण पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, परशुराम म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते बापू आठवले आदी उपस्थित होते. 
पेण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात साठ हजार मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असल्याचे उमेदवार नंदा म्हात्रे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

कॉंग्रेस पक्ष हा आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहे. पेण मतदारसंघात कॉंग्रेसने जरी उमेदवारी दाखल केली असली तरी पुरोगामी विचारांच्या मतांमध्ये फूट पडू नये म्हणून त्यांच्याजवळ चर्चा केली जाईल. 
- धैर्यशील पाटील, शेकाप 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue