कर्जतमध्ये लोकलची पूजा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

पहाटे 4 नंतर सुटणाऱ्या पहिल्या लोकल गाड्यांमधून चाकरमानी व व्यावसायिक दररोज प्रवास करतात. मुंबईला जाण्यासाठी सर्वांत वेळेवर, सर्वांत स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणजे रेल्वेचा त्यातच लोकल गाड्यांनी हजारो प्रवासी ये-जा करीत असतात.

नेरळः दररोज इच्छित स्थळी वेळेवर व न चुकता पोहचविणाऱ्या प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल गाड्यांची पूजा गेल्या अनेक वर्षांपासून कर्जतकर दसऱ्याच्या निमित्ताने करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी करतात. हल्लीच्या संगणकीय युगातही या पूजेला खंड पडला नाही. जीवनवाहिनीच्या पूजेची परंपरा अजूनही सुरू आहे. काही प्रवासी निवृत्त झाले तरीही ते जीवनवाहिनीच्या पूजेसाठी आवर्जून उपस्थित असतात. कर्जतहून सुटणाऱ्या बहुतांश लोकल गाड्यांची पूजा त्या-त्या गाडीने जाणाऱ्या प्रवाशांनी अगदी मनोभावे करून आपल्या जीवनवाहिनीबद्दल आदर व्यक्त केला.

पहाटे 4 नंतर सुटणाऱ्या पहिल्या लोकल गाड्यांमधून चाकरमानी व व्यावसायिक दररोज प्रवास करतात. मुंबईला जाण्यासाठी सर्वांत वेळेवर, सर्वांत स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणजे रेल्वेचा त्यातच लोकल गाड्यांनी हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. याची उतराई म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी हे प्रवासी आपल्या जीवनवाहिनीची न चुकता मनोभावे पूजा करतात. या सर्व लोकल गाड्यांच्या प्रवाशांपैकी सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी कर्जतहून सुटणाऱ्या लोकलचे प्रवासी फारच हौसी. त्यांनी आपापले डबे सजविलेच; शिवाय लोकलच्या पहिल्या डब्याचा पुढचा भागही सजविला होता. या लोकलचे मोटरमन सुनील पाळंदे आणि गार्ड व्ही. एम. धनवट यांचा सत्कार असिफ मिर्झा आणि रामचंद्र पांगारे यांनी शाल व श्रीफळ देऊन केला.

या गाडीने बदलापूरहून पहिल्या वर्गाच्या डब्यातून नेहमी प्रवास करणारे हर्षल पोतदार, अक्षय फाळे हे त्याच गाडीत बसून कर्जतपर्यंत डबा सजवित आले आणि नंतर मुंबईकडे मार्गस्थ झाले. सर्व डबे त्या-त्या प्रवाशांनी सजविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue