आरोपी दोन वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना धमकावून लूटमार करण्यासह विविध चोरीचे गुन्हे त्याच्या नावावर नोंद होते. द्रुतगती मार्गावर फूडमॉल येथेही विश्‍वासने गुन्हा केला होता. खोपोली आणि खालापूर पोलिस ठाण्यांत विश्‍वासवर दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल होते; परंतु दोन वर्षांपासून पोलिस शोध घेऊनही अट्टल गुन्हेगार विश्‍वास पोलिसांना हुलकावणी देत होता.

खालापूर- दरोड्यातील आरोपी विश्‍वास तुळशीराम वाघमारे (रा. निंबोडे दांडवाडी खालापूर) याच्या खालापूर पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या असून, दोन वर्षांपासून विश्‍वास पोलिसांना चकमा देत होता.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना धमकावून लूटमार करण्यासह विविध चोरीचे गुन्हे त्याच्या नावावर नोंद होते. द्रुतगती मार्गावर फूडमॉल येथेही विश्‍वासने गुन्हा केला होता. खोपोली आणि खालापूर पोलिस ठाण्यांत विश्‍वासवर दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल होते; परंतु दोन वर्षांपासून पोलिस शोध घेऊनही अट्टल गुन्हेगार विश्‍वास पोलिसांना हुलकावणी देत होता.

निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलिसी रडारवर असलेल्या सर्व गुन्हेगारांची कसून माहिती घेत असताना खालापूर पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांनी विश्‍वास वाघमारेभोवती सापळा आवळत पोलिस हवालदार योगेश जाधव, रणजित खराडे, पोलिस शिपाई संदीप मोराळे व दत्ता किसवे यांचे विशेष पथक नेमले. हे पथक विश्‍वासच्या मागावर होते. दिवाळीपूर्वी चोरी करण्याची पद्धत विश्‍वासची असल्याने पुन्हा चोरीसाठी सक्रिय होणार हे पोलिसांना माहीत होते. त्याच प्रयत्नात विश्‍वास मूळ गावी निंबोडे येथे आला असता पोलिसांनी गठडी वळली. खालापूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue