कर्जतमध्‍ये पथनाट्यातून जनजागृती

कर्जतमध्‍ये पथनाट्यातून जनजागृती

नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. 


भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी; वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत; विक्रम देशमुख यांच्या सहकार्याने ‘विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान’ या विषयावर कर्जत विधानसभा मतदारसंघात चित्ररथ फिरवून मतदान जागृती केली.

स्वयंसिद्धा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून दहिवली, कर्जत पोलिस ठाणे, कपालेश्वर मंदिरासमोर, कर्जत रेल्वेस्थानक, मच्छीगल्ली, धापया मंदिराशेजारी, कर्जत नगर परिषदेसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, भाजी मार्केट, कर्जत, चारफाटा, डिकसळ, महेश टॉकीजसमोर, नेरळ रेल्वेस्थानक, नेरळ अंबिका भुवन नाका, नेरळ बसस्थानक, नेरळ मार्केट अशा विविध ठिकाणी मतदारांमध्‍ये जनजागृती करण्‍यात आली. या वेळी मतदानाचे महत्त्‍व सांगण्‍यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com