कर्जतमध्‍ये हेल्मेट घालून दांडिया नृत्य

 हेल्मेट घालून दांडिया खेळताना असोसिएशनचे पदाधिकारी.
हेल्मेट घालून दांडिया खेळताना असोसिएशनचे पदाधिकारी.

नेरळ : कर्जत मेडिकल असोसिएशनकडून दरवेळी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्यात दुचाकी अपघात झाल्यानंतर डॉक्‍टरकडे जखमीला आणले जाते, त्यावेळी नातेवाईक संताप व्यक्त करीत असतात. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, असा संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून दांडिया खेळत कोजागरी पौर्णिमा उत्सव कर्जत मेडिकल असोसिएशनने साजरा केला.

कर्जत येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीय यांनी रास गरबा सादर केला. यात चक्क हेल्मेट घालून दांडिया खेळून कर्जत मेडिकल असोसिएशनकडून संदेश देण्याचा प्रयत्न झाला. त्यात प्रामुख्याने डॉक्‍टरांकडे दुचाकी अपघातानंतर येणाऱ्या जखमी रुग्णांची संख्या मोठी असते. तरुण मोठ्या प्रमाणात हेल्मेट न वापरता वाहने धूम स्टाईलने चालवत असतात. त्यांचे आयुष्य मोलाचे आहे, असा संदेश देण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनने हेल्मेट घालून दांडिया नृत्य करीत कोजागरी साजरी केली.

‘बेटी बचाव’बाबत जनजागृती
याच कार्यक्रमात महिलांनी ‘बेटी बचाव’च्या घोषणा देत दांडियावर ताल धरला. त्यावेळी एकाच रंगमंचावर ‘बेटी बचाव आणि हेल्मेट वापरा’ अशा घोषणा देण्यात आल्या गेले. कर्जत मेडिकल असोसिएशनच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले असून दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली जाईल, असे आश्‍वासन कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जी. ए. साळुंखे यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. स्वप्नील पडते, डॉ. म्हात्रे, डॉ. पाटील, डॉ. माने यांच्यासह सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com