रसायनीत मेट्रो रेल्‍वे आणणार!

उपस्‍थितांना संबोधित करताना महेश बालदी.
उपस्‍थितांना संबोधित करताना महेश बालदी.

रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, धरणांच्या माध्यमातून विभागात मुबलक पाणीपुरवठा, रस्ते, मैदान, अशा पायाभूत सोयीसुविधा देण्याबरोबरच रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी गोवा राज्याचे माजी मंत्री रमेश तवडकर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, माजी आमदार देवेंद्र साटम, ज्येष्ठ नेते लक्ष्मण पवार, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, ज्ञानेश्‍वर मुंढे, रामदास ठोंबरे, चंद्रकांत भोईर, विद्याधर मोकल, अविनाश गाताडे, शिवाजी माळी, लक्ष्मण पारंगे, प्रवीण खंडागळे, हरिचंद्र बांडे, विजय मुरकुटे, संदेश जाधव, किरण माळी, ज्ञानेश्‍वर सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी महेश बालदी म्हणाले, की आम्ही कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही. जाती-धर्माच्या नावाने राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम इतर जण करीत आहेत. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, त्यामुळेच लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. या वेळी हिंमत असेल तर जातीपातीचे राजकारण न करता विकासावर बोला, असे आव्हानही बालदी यांनी विरोधकांना दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com