पाताळगंगा परिसरात मिळणार मुबलक पाणी

रसायनी : पाताळगंगा नदीवरील एमआयडीसी बंधाऱ्याच्या झडपा बंद करण्यात आल्या आहेत.
रसायनी : पाताळगंगा नदीवरील एमआयडीसी बंधाऱ्याच्या झडपा बंद करण्यात आल्या आहेत.

रसायनी : पाताळगंगा नदीवरील एमआयडीसी बंधाऱ्याच्या झडपा सोमवारी बंद करण्यात आल्या. बंधाऱ्यावरील झडपा बंद करण्यात आल्याने आता मुबलक पाणीसाठा जमा होत आहे. त्यामुळे कारखानदारांसह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून रसायनी पाताळगंगातील कारखाने तसेच खालापूर आणि पनवेल तालुक्‍यातील वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, सावळे, जाताडे, वावेघर, तुराडे, बारवाई, पोयंजे, कोन, कसळखंड, भिंगार, पळस्पे आदी ग्रामपंचायत हद्दीतील ३५ हून जास्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने आणि खालापूर व पनवेल तालुक्‍यातील वडगाव, कराडे खुर्द, जांभिवली, चावणे या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुमारे १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

पावसाळ्यात नदीला आलेल्या महापुरामुळे बंधाऱ्याच्या झडपांचे नुकसान झाले होते; मात्र पावसाळा लांबल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. त्यामुळे बंधाऱ्यात कमी पाणीसाठा जमा होत असल्याने बंधाऱ्यावरील उदंचन केंद्रातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा कमी होत होता. त्यामुळे एमआयडीसीच्या मोहोपाडा आणि पाताळगंगा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे बंधाऱ्यांच्या झडपाच्या दुरुस्तीची मागणी विनायक भोईर यांच्यासमवेत ग्रामस्थांनी केली होती.

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये ४ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. एमआयडीसी बंधाऱ्याच्या झडपा प्रशासनाने सोमवारी बंद केल्याने आता मुबलक पाणीसाठा जमा होत असल्याची माहिती एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मसुरकर यांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com