कशेळे येथे महाआघाडीची प्रचारफेरी

आमदार सुरेश लाड यांच्या प्रचारासाठी फेरी काढण्यात आली.
आमदार सुरेश लाड यांच्या प्रचारासाठी फेरी काढण्यात आली.

कर्जत : कर्जत मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्‍या प्रचारार्थ कशेळे येथे प्रचारफेरी काढण्‍यात आली. यावेळी कशेळे येथे लाड यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे यांनी व्यक्‍त केला आहे. 
त्‍यांनी मोग्रज, सावळे, मांडवणे, हुमगांव, वैजनाथ, भिवपुरी, कशेळे या ग्रामपंचायतींमधील सर्व गावांतील मतदारांची भेट घेऊन संवाद साधला.

कशेळे पंचायत समिती विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या विभागातील अनेक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रसच्या ताब्यात असून येथे सुरेश लाड किमान दोन हजार मतांनी पुढे राहतील, असा विश्‍वास हरपुडे यांनी व्‍यक्‍त केला. 

कशेळे येथे महाआघाडीच्या प्रचारफेरीत समाजकल्याण सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई दिसले, पंचायत समिती सदस्या जयवंती हिंदोळा, कशेळेच्या सरपंच हर्षदा राणे, उपसरपंच आत्माराम खंडागळे, मोग्रज सरपंच रेखा देशमुख, उपसरपंच विलास भला, सावळेच्या सरपंच नंदा गायकर, उपसरपंच मोहन धुळे, हुमगावचे शिवाजी बार्शी, दिलीप भुंडेरे, नामदेव सोनावळे, बाळू दाभाडे, नामदेव गायकवाड, रमेश आगाज, अर्जुन मसणे, अनंता घाडगे, जैतू धुळे, हरिश्‍चंद्र माळी, जयवंत भोसले, संभाजी तुर्डे, केशव वाघमारे, रामदास शेळके, मुन्ना गरुड, शंकर मोरमारे, दिव्या राणे, शैला तुपे, गुलाब घाडगे, प्रज्ञा तुपे, कविता तुपे, माधुरी हरपुडे, तनुजा भोर्डे, हर्षदा जोशी यांच्यासह प्रत्‍येक गावातील शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com