मतदानवाढीसाठी महाडमध्‍ये जनजागृती

मतदान वाढीसाठी प्रशासनाच्‍या वतीने प्रचार फेरी काढण्‍यात आली.
मतदान वाढीसाठी प्रशासनाच्‍या वतीने प्रचार फेरी काढण्‍यात आली.

महाड : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांतून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. महाडमध्येही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. 

भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना देण्यात आलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे. याकरिता पथनाट्य, डिजिटल माध्यम, जाहिरात फलक याशिवाय विविध शालेय उपक्रमांतून मतदानाबाबत जागृती करण्यात येत आहे. महाडमध्येही निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयापासून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरून महाड शहरातील म. गांधी मार्ग, बाजारपेठ, साळीवाड नाका, चवदारतळे ते छत्रपती शिवाजी चौक ते प्रांत कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये त्यांनी मतदान करण्याबाबत घोषणा दिल्या. महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मी मतदान करणार या फलकावर सह्यांची मोहीमही राबवली गेली. 
या रॅलीमध्ये महाड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार हे स्वतः सामील झाले होते. त्यांच्यासह तहसीलदार चंद्रसेन पवार, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार अरविंद घेमुड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव सहभागी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com