लोकशाही बळकटीसाठी स्वयंसेविकांचा पुढाकार 

पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी संपूर्ण पाली शहरातून मतदान जनजागृती रॅली काढून पत्रकाचे वाटप केले.
पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी संपूर्ण पाली शहरातून मतदान जनजागृती रॅली काढून पत्रकाचे वाटप केले.

पाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व पत्रके वाटून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन आशा स्वयंसेविकांनी केले. 

जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मढवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली मानकर, डॉ. प्रीती मणियार, आरोग्य सहायक स्वप्नजा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक पार पडली. या बैठकीत मतदान जनजागृतीसंदर्भात माहिती देण्यात आली.

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रानेदेखील मतदान जनजागृतीचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. एकूण लोकसंख्येमध्ये आजही अशिक्षित समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा मतदारांना निवडणुकीचे महत्त्व समजावून सांगून लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व पटवून देणेकामी जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्नशील असल्याचे दिसते.

लोक शिक्षण व प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहेत. अशातच प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदान जनजागृती फेरी महत्त्वाची ठरत असल्याचे सांगण्यात आले. पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविका यांनी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. त्यानंतर पत्रकाचे वाटप करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी वाय. के. वारगुडे, सिद्धेश पाटील, दत्ता म्हात्रे आदींसह आशासेविका उपस्थित होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com